
Filatex Share Price | फिलाटेक्स फॅशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार खरेदी पाहायला मिळत होती. आज हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. मंगळवारी फिलाटेक्स फॅशन्स स्टॉक 6 टक्के वाढीसह 7.86 रुपये किमतीवर पोहोचला होता. ( फिलाटेक्स फॅशन्स कंपनी अंश )
मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फिलाटेक्स फॅशन्स कंपनीचे शेअर्स 6.46 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन दिवसात फिलाटेक्स फॅशन्स कंपनीचे शेअर्स 22 टक्क्यांनी मजबूत झाले होते. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी फिलाटेक्स फॅशन्स स्टॉक 3.37 टक्के घसरणीसह 7.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच फिलाटेक्स फॅशन्स या स्मॉल कॅप कंपनीने 1:5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. स्टॉक स्प्लिटची पात्रता निश्चित करण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 9 ऑगस्ट 2024 हा दिवस निश्चित केला आहे. याशिवाय कंपनीला मिळालेल्या नवीन ऑर्डरनंतर स्टॉक फोकसमध्ये आला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी फिलाटेक्स फॅशन्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, त्यांना 35 दशलक्ष डॉलर्सची निर्यात ऑर्डर मिळाली आहे.
फिलाटेक्स फॅशन कंपनीने आपल्या शेअरची तरलता वाढवण्यासाठी स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने 1 शेअर 5 तुकड्यात विभाजित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. 2023-24 मध्ये या कंपनीने 179.02 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात कंपनीचा निव्वळ नफा 8.95 कोटी रुपये होता. मार्च 2024 तिमाहीत फिलाटेक्स फॅशन्स कंपनीने 2.56 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. याच तिमाहीत कंपनीचे महसूल उत्पन्न 69.59 कोटी रुपये होते. या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाही.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.