
Finolex Cables Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना देखील फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.52 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. एकेकाळी 26 रुपये किमतीवर ट्रेड करणारे फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता 1,029 रुपये किमतीवर पोहचले आहेत. (Finolex Share Price)
मागील 1 महिन्यात, फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14.80 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52.88 टक्के नफा कमावून दिला आहे. परतावा देऊन त्यांना श्रीमंत केले आहे. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 1,029.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 1 वर्षात, फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. याकाळात शेअरची किंमत 458 रुपयेवरून वाढून 1040 रुपयेवर पोहचली होती. फिनोलेक्स केबल कंपनीचे शेअर्स 20 ऑक्टोबर 2022 रोजी 448 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर हा स्टॉक 130 टक्के वाढून 1040 रुपये किमतीवर पोहोचला होता. फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1593 कोटी रुपये आहे.
27 मार्च 2020 रोजी फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 188 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी पैसे लावले होते, त्या गुंतवणूकदारांचे पैसे 6 पट वाढले आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते फिनोलेक्स केबल कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 20 टक्के नफा कमावून देऊ शकतात.
जून 2023 तिमाहीत, फिनोलेक्स केबल कंपनीने 19 टक्के वाढीसह 1204 कोटी रुपये निव्वळ विक्री साध्य केली आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीने जून 2023 तिमाहीत 38 टक्क्यांच्या वाढीसह 132 कोटी रुपये अधिक नफा कमावला आहे. फिनोलेक्स केबल कंपनीचे शेअर्स पुढील काळात मल्टीबॅगर नफा कमावून देतील. 1 जानेवारी 1999 रोजी फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 21 रुपये या किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून आतपर्यंत गुंतवणूकदारांनी 4800 टक्के नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.