9 June 2023 12:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

पालघरच्या मच्छीमारची घोळ माशामुळे लॉटरी | एका दिवसात एवढ्या कोटींचा लिलाव

Ghol Fish

पालघर, ०४ सप्टेंबर | महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक मच्छीमार एका झटक्यात करोडपती झाला आहे. पालघरमध्ये फिशिंग टेकल म्हणून काम करणारे चंद्रकांत तरे आपल्या 7 साथीदारांसह नेहमीप्रमाणे समुद्रात मासेमारीला गेले. मात्र, यावेळी जाळ्यात अडकलेल्या माशांची किंमत कोट्यवधी होती आणि नशिबच पालटलं. यावेळी ‘सी गोल्ड’ नावाचे दुर्मिळ मासे (Sea Gold fish) त्यांच्या जाळ्यात अडकले. आणि लॉटरीच लागली.

पालघरच्या मच्छीमारची घोळ माशामुळे लॉटरी, एका दिवसात एवढ्या कोटींचा लिलाव – Fisherman nets ghol fish and earns rupees 1 33 crore in auction :

चंद्रकांत आणि त्याच्या साथीदारांच्या जाळ्यात 157 Sea Gold मासे एकत्र पकडले गेले. परतल्यावर चंद्रकांतने त्यांना विकले तेव्हा ते 1.33 कोटी रुपयांना विकले गेले. या माशांचा लिलाव पालघरच्या मुरबेमध्ये झाला. चंद्रकांतचा मुलगा सोमनाथ याने सांगितले की त्याने प्रत्येक मासा सुमारे 85 हजार रुपयांना विकला आहे.

कुठे मिळाले हे मासे?
चंद्रकांत यांनी सांगितले की, ते 7 लोकांसह समुद्रात 20 ते 25 नॉटिकल मैल समुद्रात वाधावनच्या दिशेने हरबा देवी नावाच्या बोटीने गेले होते. ते या आधी कित्येक वेळा या भागात मासे पकडण्यासाठी आले आहेत. यावेळी 157 Sea Gold मासे त्याच्या जाळ्यात अडकले. चमकते मासे पाहूनच त्यांना समजले की आता त्याचे नशीबही चमकले आहे. समुद्रातील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे हे मासे आता किनाऱ्यावर सापडत नाहीत. या माशांच्या शोधात मच्छीमारांना खोल समुद्रात जावे लागते, असे चंद्रकांतच्या यांनी सागितले.

‘सी गोल्ड’ मासे इतके महाग का आहेत?
या माशाचे वैज्ञानिक नाव ‘प्रोटोनिबीया डायकॅन्थस’ (Protonibea Diacanthus) आहे. त्याला ‘सी गोल्ड’ मासे असे म्हणतात. कारण या माशांचा वापर औषधे आणि सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी केला जातो. थायलंड, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर सारख्या आपोआप स्वतःच वितळतात, ते देखील या माशापासून बनवले जातात. म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात या माशांची किंमत जास्त आहे. हे मासे यूपी आणि बिहारमधील व्यापाऱ्यांनी खरेदी केले आहेत, असे मच्छीमार सोमनाथ यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Fisherman nets Ghol fish and earns rupees 1 33 crore in auction.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x