 
						Fonebox Retail IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. फोनबॉक्स रिटेल कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीचा IPO गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 ते 30 जानेवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये देखील धुमाकूळ घालत आहेत. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, फोनबॉक्स रिटेल कंपनीचे 120 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
फोनबॉक्स रिटेल कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 66 ते 70 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. म्हणजेच ग्रे मार्केट प्रीमियम किंमत आणि IPO शेअर्सची किंमत बँड विचारात घेतली तर, फोनबॉक्स रिटेल कंपनीचा IPO स्टॉक 190 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.
ज्या गुंतवणूकदारांना फोनबॉक्स रिटेल कंपनीचे IPO शेअर्स वाटप केले जातील, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 171 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. फोनबॉक्स रिटेल कंपनी आपल्या शेअरधारकांना 31 जानेवारी 2024 रोजी IPO शेअर्स वाटप करेल. त्याच वेळी या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.
फोनबॉक्स रिटेल कंपनीने आपल्या IPO साठी 1 लॉटमध्ये 2000 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणुकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 140000 रुपये जमा करावे लागतील. फोनबॉक्स रिटेल कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत.
या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 20.37 कोटी रुपये आहे. आयपीओपूर्वी कंपनीमध्ये प्रवर्तकांनी कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल धारण केले होते. IPO नंतर हे प्रमाण 71.64 टक्केवर येईल. फोनबॉक्स रिटेल लिमिटेड ही कंपनी मुख्यतः स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजची मल्टीब्रँड रिटेलर म्हणून व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		