14 December 2024 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Gabriel India Share Price | मालामाल शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.10 कोटी रुपये परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा

Gabriel India Share Price

Gabriel India Share Price | ‘गॅब्रिएल इंडिया’ या शॉक ऍब्जॉर्बर्स स्ट्रट्स आणि फ्रंट फोर्क्स यांसारखे राइड कंट्रोल उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स आज लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.41 टक्के घसरणीसह 139.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मात्र दीर्घकाळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील एका महिन्यात ‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये 14.40 टक्के पडझड पाह्याला मिळाली आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या घसरणीकडे लोकांनी एक गुंतवणुकीची संधी म्हणून पहावे. तज्ज्ञांच्या मते ‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 17 टक्के वाढू शकतात. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 3.68 टक्के वाढीसह 147.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2124.49 कोटी रुपये आहे. (Gabriel India Limited)

‘गॅब्रिएल इंडिया’ मल्टीबॅगर स्टॉक :
‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीचे शेअर्स 2 नोव्हेंबर 2001 रोजी फक्त 1.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक 139.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ज्या लोकांनी 2001 मध्ये गॅब्रिएल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.10 कोटी रुपये झाले आहेत. ‘ गॅब्रिएल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सने दीर्घ काळात आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे.

ब्रोकरेजने दिला खरेदीचा सल्ला :
मागील वर्षी 12 मे 2022 रोजी ‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीचे शेअर्स 102.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर 29 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजेच अवघ्या सहा महिन्यांत हा स्टॉक 96 टक्क्यांनी वाढीसह 200.65 रुपये या आपल्या पाच वर्षातील उच्चांक किमतीवर पोहोचला होता. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या एकूण विक्रीत EV चा वाटा 9 टक्के होता, जो मागील एका वर्षभराच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढला आहे. ईव्हीमध्ये कंपनीने 60 टक्के बाजार हिस्सा काबीज केला आहे. आणि ओला, एथर, टीव्हीएस, अॅपिअर आणि ओकिनावा या सारखे दिग्गज ब्रँड ‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीचे ग्राहक आहेत. डच ट्रक आणि ई सायकलच्या ऑर्डरमुळे कंपनीने जागतिक बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीला नुकताच युटिलिटी वाहनांसाठी नवीन ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत, ज्यात वार्षिक आधारावर 50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या श्रेणीमध्ये कंपनीने बाजारातील 33 टक्के वाटा काबीज केला आहे. चांगल्या उत्पादनांचे मिश्रण आणि किमतीत वाढ झाल्यामुळे डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या महसूल संकलनात 17 टक्के वृध्दि झाली आहे. विक्रीतील स्थिर वाढ आणि निर्यात यामुळे कंपनीला मजबूत पाठिंबा मिळाला आहे. ऑर्डर बँक लॉग आणि नवीन उत्पादनांद्वारे कंपनीच्या महसुलात वाढ होत आहे. आता आर्थिक वर्ष 2024 आणि 2025 मध्ये कंपनीच्या कमीत जबरदस्त वाढ होणार आहे, असे कंपनीच्या कामगिरीवरून दिसते. मजबूत कमाई वाढीची शक्यता पाहता ब्रोकरेज फर्म जिओजित BNP पारिबसने ‘गॅब्रिएल इंडिया’ कंपनीचे शेअर्स 173 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gabriel India Share Price 505714 on 20 March 2023.

हॅशटॅग्स

Gabriel India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x