25 September 2023 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks to Buy | साउथ इंडियन बँकेचा शेअर 26 रुपयाचा, पण 6 दिवसात 13.50 टक्के परतावा दिला, आता 15 टक्के कमाई करा Tata Power Vs GMR Power Share | कोणता शेअर पॉवर दाखवेल? या शेअरने 1 महिन्यात 74% परतावा दिला, कोणता शेअर आहे स्वस्त? Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे टॉप 5 शेअर्स मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, फायद्याची यादी सेव्ह करा Mangal Ketu Yuti | या आहेत त्या 3 भाग्यवान राशी, मंगळ-केतूच्या युतीने नशीब फळफळणार, अत्यंत फायदेशीर काळ, तुमची राशी आहे? HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या उच्च शिक्षित RBI चीफ उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हणाले होते पीएम मोदी, माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक दावा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! अपेक्षेपेक्षा अधिक मिळू शकते महागाई भत्ता आणि पगार वाढ, महत्वाची अपडेट्स
x

Gabriel Share Price | चमत्कारी चॉकलेट किंमतीचा शेअर! 2 रुपये 50 पैशाच्या गॅब्रिएल इंडिया शेअरने करोडपती बनवलं, पुढेही मल्टिबॅगर?

Gabriel Share Price

Gabriel Share Price | गॅब्रिएल इंडिया या राइड कंट्रोल उत्पादने बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मात्र आज या स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडो रुपये नफा मिळवून दिला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 2.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 300 रुपयेच्या पार गेला आहे.

ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनपी परिबासच्या तज्ञांच्या मते गॅब्रिएल इंडिया कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 13 टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात. गॅब्रिएल इंडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,559.98 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी गॅब्रिएल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 316.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

20 सप्टेंबर 2002 रोजी गॅब्रिएल इंडिया कंपनीचे शेअर्स 2.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 12110 टक्क्यांच्या वाढीसह 316.45 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच मागील 21 वर्षापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 82000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता करोडो रुपये झाले आहे.

28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 129.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच अवघ्या 5 महिन्यांत गॅब्रिएल इंडिया कंपनीचे शेअर्स 161 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 5 सप्टेंबर 2023 रोजी गॅब्रिएल इंडिया कंपनीचे शेअर्स 338.35 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

गॅब्रिएल इंडिया कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये EV विक्रीचा वाटा 9 टक्के आहे. EV सेगमेंटमध्ये या कंपनीने बाजारातील तब्बल 60 टक्के वाटा काबीज केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन तज्ञांनी स्टॉकमध्ये किंचित घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते गॅब्रिएल इंडिया कंपनीचे शेअर्स पुढील काळात 275 रुपये किमतीपर्यंत घसरू शकतात. म्हणून तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स तत्काळ विकण्याचा सल्ला दिला आहे.

गॅब्रिएल इंडिया कंपनी आपल्या वाहन क्षेत्रातील ग्राहकांसाठी शॉक अब्सोर्बर, स्ट्रट्स आणि फ्रंट फोर्स यांसारखी राइड कंट्रोल उत्पादने बनवण्याचे काम करते. वाहन निर्मिती क्षेत्रातील दिग्गज Ola, Ather, TVA, Ampere आणि Okinawa यासारख्या कंपन्या गॅब्रिएल इंडिया कंपनीचे ग्राहक आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनबी परिबासच्या मते सबसिडी कपात आणि प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह फायद्यांबाबत भारत सरकारच्या कठोर धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांमधील मागणी स्थिर राहण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gabriel Share Price today on 18 September 2023.

हॅशटॅग्स

Gabriel Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x