 
						Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजीनियरिंग या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांच्या व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षांत अपाज्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांत जेनसोल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 66 रुपयेवरून वाढून 2000 रुपये किमतीवर पोहचले होते. या काळात जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2900 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमवून दिला आहे.
जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2119.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 797.05 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी जेनसोल इंजीनियरिंग स्टॉक 2.74 टक्के घसरणीसह 1,958.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 ऑक्टोबर 2021 रोजी ज्या गुंतवणूकदारांनी जेनसोल इंजीनियरिंग स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 30 लाखांपेक्षा जास्त झाले आहे. 1 ऑक्टोबर 2021 रोजी जेनसोल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 66.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2035 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 2 वर्षात जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2947 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2021 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 30.04 लाख रुपये झाले असते.
जेनसोल इंजीनियरिंग कंपनी एकूण बाजार भांडवल 2465 कोटी रुपये आहे. 2023 या वर्षात जेनसोल इंजीनियरिंग स्टॉक 101 टक्के वाढला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी जेनसोल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 1013.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 सप्टेंबर 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 2035 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील 6 महिन्यांत जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 51 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		