
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला गुजरात राज्यात बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम उभारण्यासाठी 450 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स पुन्हा चर्चेत आले आहे. ( जेनसोल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
सोमवार दिनांक 11 मार्च रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 7.67 टक्के घसरणीसह 935 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5.57 टक्के घसरणीसह 868.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकल अग्रवाल यांनी देखील जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. नुकताच या कंपनीला 250-500 MW स्टैंडअलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम प्रकल्पातून 70-140 MW क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी करण्याचे काम मिळाले आहे. या प्रकल्पामुळे जेनसोल कंपनीच्या महसुल संकलनात 450 कोटी रुपये वाढ होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ED ने हवाला ऑपरेटर हरी शंकर टिब्रेवालाविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप सट्टेबाजी प्रकरणात ईडीने हरिशंकर टिब्रेवाला यांच्याशी संबंधित संस्थांवर छापेमारी करून त्याची मालमत्ता जप्त केली आहे. टिब्रेवाला विविध कंपन्यांच्या मदतीने शेअर बाजारात गुंतवणूक करून सट्टेबाजी करतो आणि बेकायदेशीर कमाईचे वैध कमाईत रूपांतर करतो.
जेनिथ मल्टी ट्रेडिंग डीएमसीसी ही टिब्रेवाला याची कंपनी आहे. त्याने या कंपनीच्या माध्यमातून सर्वोटक पॉवर सिस्टम्स, जेनसोल इंजिनीअरिंग, प्रितिका ऑटो, बालू फोर्ज आणि स्टार हाउसिंग फायनान्स यासारख्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. मागील 3 वर्षांत जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4,500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 45 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.