 
						Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 18 ऑक्टोबर 2019 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 1900 रुपयेच्या पार गेला आहे. या काळात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2900 टक्के नफा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1829 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 5 दिवसांत जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10.3 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 1,920 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
22 डिसेंबर 2021 नंतर जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरची किंमत 59 रुपयेवरून 31 पट अधिक वाढवली होती. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मंडळ आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
या बैठकीत 2022-23 या आर्थिक वर्षाचा निकाल देखील मंजूर होण्याची शक्यता आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत मेसर्स आरजे अँड असोसिएट्सची कॉस्ट ऑडिटर म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पारित केला जाऊ शकतो. कंपनीचे संचालक आपल्या अकराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा निर्णय देखील या बैठकीत घेतील.
दोन दिवसांपूर्वी जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला दुबई स्थित कंपनीने 102 कोटी रुपये मूल्याचा सौर ऊर्जा ईपीसी प्रकल्प उभारण्याची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर मिळाल्यानंतर जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीला जास्त काम मिळायला सुरुवात झाली आणि कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. मागील महिन्यात या कंपनीला 300 इलेक्ट्रिक वाहनांचा पुरवठा आणि देखभाल करण्याचा 5 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची बातमी शेअर बाजारात चर्चिली जात होती. आणि जुलै 2023 मध्ये जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीला OREDA कडून 300 इलेक्ट्रिक वाहनांसह फ्लीट मॅनेजमेंट सेवेचा 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		