
GG Engineering Share Price | जीजी इंजिनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळापासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.60 टक्के वाढीसह 2.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
5 रुपये पेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करणाऱ्या शेअरमध्ये मागील पाच दिवसांपासून जोरदार खरेदी सुरू आहे. आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी जीजी इंजिनियरिंग स्टॉक 4.88 टक्के वाढीसह 2.58 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील सलग पाच ट्रेडिंग सेशनपासून जीजी इंजिनियरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला हीट करत आहेत. या कालावधीत शेअरची किंमत 20 टक्क्यांनी वाढली आहे. 18 जानेवारी 2024 पासून जीजी इंजिनियरिंग स्टॉक 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला स्पर्श करत आहे.
मागील सहा महिन्यांत जीजी इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच पार पडलेल्या बैठकीत जीजी इंजिनियरिंग कंपनीच्या संचालक मंडळाने 13,50,00,000 वॉरंटचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर आणि वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही रूपांतरण प्रक्रिया SEBI ( ICDR ) विनियम 2018 मधील तरतुदींनुसार करण्यात येत आहे.
जीजी इंजिनियरिंग ही कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी इलेक्ट्रिक उपकरणे बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची सुरुवात 23 जानेवारी 2006 रोजी मुंबई मध्ये झाली होती. जीजी इंजिनियरिंग कंपनी बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील ग्राहकांना स्ट्रक्चरल स्टील, अॅग्रीकल्चरल पाइप टॉर स्टील आणि एमएस पाईप्स पुरवठा करणे हा मुख्य व्यवसाय आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.