 
						Glenmark Share Price | ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज या कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत आहेत. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर 22.50 रुपये लाभांश वाटप करणार आहे.
मागील 6 महिन्यांत ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस स्टॉक 0.83 टक्के वाढीसह 804.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेकॉर्ड डेट तपशील
ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 22.50 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 17 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच या दिवशी ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, कंपनी त्यांना लाभांश वाटप करेल. यापूर्वी ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस कंपनीने 21 रुपये लाभांश वाटप केला होता.
शेअरची कामगिरी
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस कंपनीचे शेअर्स 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 650.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 675 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 370 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		