 
						Global Capital Market Share Price Today | ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट तोडत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 2.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना नुकताच स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ दिला होता. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 6 बोनस शेअर्स मोफत दिले होते. कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख म्हणून 20 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला होता. (Globalal Capital Market Limited)
स्टॉक स्प्लिट प्रमाण :
‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये होते. कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यामध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. स्टॉक स्प्लिटनंतर ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. याशिवाय कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 10 शेअर्सवर 6 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट म्हणून कंपनीने 20 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
कंपनीची कामगिरी :
मागील एका वर्षात ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 5 एप्रिल 2022 रोजी ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 19 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 31.42 रुपयांवर पोहचला होता.
आता स्टॉक स्प्लिट नंतर शेअरची किंमत खाली आली आहे. म्हणजेच या काळात ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 482 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		