5 June 2023 10:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Stock in Focus | हा शेअर तब्बल 60 टक्क्याने स्वस्त झालाय, खरेदी करावा का? स्टॉकचा तपशील वाचा

Stock in Focus

Stock in Focus | ग्लोबस स्पिरिट्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये 13 टक्क्यांनी पडले होते. बीएसई निर्देशांकावर हा स्टॉक 700 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचला आहे. बेव्हरेजेस आणि डिस्टिलरीज कंपनीचा हा स्टॉक 26 ऑक्टोबर 2022 च्या 766.05 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीच्या खाली गडगडला आहे. मागील 10 महिन्यांत हा स्टॉक 1720 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीपासून 59 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 14 जानेवारी 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 1760 रुपये हा आपला सर्वकालीन विक्रमी उच्चांक स्पर्श केला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली घसरण सप्टेंबर 2022 च्या कमजोर तिमाही निकालानमुळे दिसून आली आहे. वास्तविक या कंपनीला सप्टेंबर 2022 तिमाहीत जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे.

सप्टेंबर तिमाहीत तोटा :
ग्लोबस स्पिरिट्स कंपनीचा PAT जुलै ते सप्टेंबर या तिमाही कालावधीत 57.9 टक्के वार्षिक दराने कमी झाला आहे. तर, तिमाही-दर-तिमाही PAT मध्ये 40.7 टक्क्यांची घट पाहायला मिळाली असून कंपनीला 22.10 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. या कंपनीच्या महसुलात वार्षिक 25.7 टक्के या दराने आणि तिमाही-दर तिमाहीत आधारावर 3.7 टक्के या दराने घसरण झाली आहे. कंपनीने या तिमाही काळात 480 कोटी रुपये महसूल कमावला होता.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
Globus Spirits Limited ही कंपनी दारू आणि डिस्टिलरीज क्षेत्रात उद्योग करणारी कंपनी आहे. ही कंपनी देशी आणि विदेशी अल्कोहोल ब्रँड, उच्च दर्जाचे अल्कोहोल, हँड सॅनिटायझर्स आणि फ्रेंचाइजी बॉटल उत्पादन करण्याचे काम करते. या कंपनीचे बाजार भांडवल 2,242 कोटी आहे. ही कंपनी 1993 साली स्थापना झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Globus Spirits Limited Stock in Focus of Stock market expert for investment and huge returns on 16 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x