
GOCL Share Price | मागील 4 महिन्यांत GOCL कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. जून 2023 मध्ये या खाण कंपनीचे शेअर्स NSE मध्ये 305 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 619 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
अवघ्या 4 महिन्यांत GOCL कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी GOCL कॉर्पोरेशन स्टॉक 0.64 टक्के वाढीसह 602.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
GOCL कॉर्पोरेशन कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. GOCL कॉर्पोरेशन कंपनीला कोल इंडिया कंपनी 766 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर दिली आहे. स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, GOCL कॉर्पोरेशन कंपनीला कोल इंडिया या भारत सरकारच्या मालकीच्या महारत्न दर्जा प्राप्त कंपनीकडून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑफरचे एकूण मूल्य 766 कोटी रुपये आहे.
या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत GOCL कॉर्पोरेशन कंपनीला कोल इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणात स्फोटक पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहेत. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी GOCL कॉर्पोरेशन कंपनीला 2 वर्षाची मुदत देण्यात आली आहे.
मागील एका महिन्यात GOCL कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरची किंमत 425 रुपये किमतीचा वाढून 619 रुपये किमतीवर पोहचली आहे. मागील एका महिन्यात GOCL कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 130 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.