
Government Schemes | आज आपण या लेखात पोस्ट ऑफिस च्या काही गुंतवणूक योजनांबद्दल माहिती घेणार आहोत. त्यातीलच एक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. म्हणजेच पीपीएफमधील गुंतवणुकीवर तुम्हाला कोणताही आयकर भरावा लागत नाही. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करमुक्त आहे. सध्या या योजनेत गुंतवणुकीवर ग्राहकांना 7.1 टक्के व्याज परतावा मिळतो. पीपीएफवर मुदत ठेवींपेक्षा जास्त व्याज दिले जाते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यास 6.8 टक्के चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो. ही गुंतवणूक योजना हमखास परताव्याची शाश्वती देते. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत या योजनेतून मिळणाऱ्या व्याज परताव्याला आयकरातून सूट देण्यात आली आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा परिपक्वता कालावधी 5 वर्षे आहे. NSC मध्ये किमान गुंतवणूक मर्यादा 100 रुपये आहे. आणि कमाल गुंतवणुकीच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
सुकन्या समृद्धी योजना :
मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी सरकार तर्फे चालवल्या जाणाऱ्या या योजनेत पीपीएफ सारख्या करमुक्त-सवलतीचा लाभ दिला जातो. जर आपण या योजनेतील व्याजाबद्दल माहिती घेतली तर ही योजना 7.6 टक्के वार्षिक व्याज परतावा देते, जे बँक एफडीपेक्षा आणि इतर गुंतवणूक योजनेच्या तुलनेत खूप जास्त आहे.
किसान विकास पत्र :
या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 6.9 टक्के वार्षिक व्याज परतावा दिला जाईल. या गुंतवणूक योजनेचा परिपक्वता कालावधी 124 महिने आहे. या योजनेत किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम 1,000 रुपये आहे. आणि कमाल गुंतवणुकीच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत गुंतवणूक केल्यास कर सवलत मिळते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना :
ही योजना 60 वर्ष वयोमर्यादा ओलांडलेल्या लोकांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. ज्या वृध्द लोकांना मासिक पेन्शन मिळत नाही किंवा इतर कोणत्याही माध्यमातून उत्पन्नाचे साधन नाही, ते लोक SCSS खात्यात 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करून प्रत्येक तिमाहीत व्याज मिळवू शकतात. या योजनेत गुंतवणूक करणारे लोक त्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून व्याजाची रक्कम काढू शकतात. या योजनेत गुंतवलेली मूळ रक्कम मुदतपूर्तीनंतर परत केली जाते. त्याच योजनेत नव्याने गुंतवणूक करणे आणि नवीन खाते घेणे हे ठेवीदारांवर अवलंबून आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.