30 April 2025 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

GPT Infra Share Price | मागील 3 वर्षांत 400 टक्के परतावा देणारा GPT इन्फ्रा शेअर स्वस्त झालाय, आता मिळाली मोठी ऑर्डर, तेजीचे संकेत

GPT Infra Share Price

GPT Infra Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीत असताना जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. GPT इन्फ्रा या नागरी बांधकाम कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून मोठी ऑर्डर देण्यात आली आहे.

64 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर

GPT इन्फ्रा कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीला 64 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. दक्षिण पूर्व रेल्वे कोलकत्ताच्या गार्डन रीचमधील मुख्य साहित्य व्यवस्थापकातर्फे ही ऑर्डर जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला देण्यात आली आहे. जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला मोनोब्लॉक प्री स्ट्रेस्ड कॉंक्रिट स्लीपरसाठी ही ऑर्डर देण्यात आली आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 69.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स ही कंपनी GPT समूहाचा भाग आहे. ही कंपनी कोलकातामधील एक आघाडीची पायाभूत सुविधा कंपनी मानली जाते. 1980 मध्ये स्थापन झालेली GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनी पायाभूत सुविधा आणि स्लीपर संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये GPT इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. तर आज शेअर 70 रुपयेच्या खाली ट्रेड करत आहे.

मागील.5 दिवसात GPT इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3.75 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्सच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 22.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारी दिनांक 12 जून 2023 रोजी GPT इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 मार्च रोजी या कंपनीचे शेअर्स 42 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 69.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात GPT Infra कंपनीच्या शेअरने 3.01 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

मागील 3 वर्षांत शेअर्सनी 400 टक्के परतावा दिला

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये GPT इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स 71.50 रुपये किंमत पातळीवर ओपन झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 24.98 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत GPT इन्फ्रा शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 400 टक्के वाढवले आहेत. पायाभूत सुविधा व्यवसायात कामकाज करणाऱ्या या कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 2276 कोटी रुपये आहे. कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार आर्थिक वर्ष 2023 मधील एकूण महसूल संकलनाच्या 3 पट जास्त आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| GPT Infra Share Price today on 14 July 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

GPT Infra Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या