18 February 2025 5:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RELIANCE GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, जीटीएल कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये Horoscope Today | मंगळवार 18 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा मंगळवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, 22 फेब्रुवारीपासून या 3 राशींसाठी चांगला काळ सुरु होणार, तुमची राशी आहे का?
x

GST Collection | प्रचंड महागाईने सामान्य लोकांचा खिसा खाली होतोय, तर GST मुळे मोदी सरकारच्या तिजोरीत पैसाच-पैसा जमा होतोय

Highlights:

  • GST Collection
  • मे 2022 मध्ये जीएसटी संकलन 1.41 लाख कोटी रुपये होते
  • जीएसटी संकलनात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ
GST Collection

GST Collection | एका बाजूला महागाईने सामान्य लोकांचा खिसा खाली होतोय. मोदी सरकारच्या सत्ताकाळात महागाईने नवनवे विक्रम रचलेले असताना त्याचे परिणाम सामान्य लोकांवर असे झाले आहेत की त्यांना दैनंदिन जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करणं परवडत नाही. परिणामी प्रचंड काट कसर करावी लागत आहे.

त्यात आता शाळा-कॉलेज सुरु होणार असल्याने पुढील २ महिने घरातील मुलांच्या शिक्षणसंबंधित खर्चाने त्यात अजून भर टाकली आहे. मात्र याच सामान्य लोंकांशी संबंधित महागाईकडे कानाडोळा करून मोदी सरकार स्वतःच्या तिजोरीत जमा होणाऱ्या GST वरून स्वतःची पाठ थोपटून घेतं आहे.

महागाई सामान्य लोकांसाठी डोकेदुखी ठरत असली तरी जीएसटी पैशामुळे मोदी सरकारच्या चेहऱ्यावर हसू आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन मे महिन्यात १२ टक्क्यांनी वाढून १.५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा जीएसटी संकलन 1.50 लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे. अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. यावरून गेल्या वर्षभरात सर्व राज्यांची सातत्याने चांगली आर्थिक कामगिरी दिसून येते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मे 2022 मध्ये जीएसटी संकलन 1.41 लाख कोटी रुपये होते

मे 2022 मध्ये जीएसटी संकलन 1.41 लाख कोटी रुपये होते. यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये जीएसटी कलेक्शन 1.87 लाख कोटी रुपये पर्यंत पोहोचला होता. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, मे महिन्यात एकूण जीएसटी महसूल 1,57,090 कोटी रुपये होता. यामध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 28,411 कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) 35,828 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) 81,363 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 41,772 कोटी रुपयांसह) आणि उपकर 11,489 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 1,057 कोटी रुपयांसह) होते.

जीएसटी संकलनात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ

मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मे 2023 मधील महसूल मागील वर्षाच्या याच महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा 12 टक्के जास्त आहे. मे हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा जीएसटी संकलन १.५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये जीएसटी संकलन १.८७ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते, तर मार्चमध्ये ते १.६० लाख कोटी रुपये होते.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : GST Collection made record to previous tax collection check details on 02 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GST Collection(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x