
GTL Infra Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये मोठी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स 1.36 टक्क्यांनी म्हणजे 1,048.90 अंकांनी घसरला होता. तर एनएसई निफ्टी 1.47 टक्के म्हणजेच 345.55 अंकांनी घसरून 23,085.95 वर पोहोचाल होता. या घसरणीत जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर सुद्धा २ रुपयांच्या खाली घसरला आहे.
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती
सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर 4.76 टक्क्यांनी घसरून 1.80 रुपयांवर पोहोचला होता. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 4.33 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1.45 रुपये होता. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,293 कोटी रुपये आहे.
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड शेअर प्राईस रेंज
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरची प्रिव्हिअस क्लोजिंग प्राईस 1.89 रुपये होती. सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी दिवसभरात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा स्टॉक 1.78 ते 1.92 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. तसेच गेल्या 1 वर्षात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरची ट्रेडींग रेंज 1.45 रुपये ते 4.33 रुपयांच्या दरम्यान राहिली होती.
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील १ महिन्यात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर 18.55% घसरला आहे. मागील १ वर्षात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर 2.70% घसरला आहे. मागील ५ वर्षात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरने 350% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर 92.39% घसरला आहे.
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीवरील कर्ज आणि FII – DII हिस्सेदारी
सोमवार, 13 जानेवारी 2025 पर्यंत जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीवर 3,817 कोटी रुपये कर्ज आहे. तर जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीत एफआयआयची 0.12 टक्के हिस्सेदारी आहे. तर डीआयआय’ची हिस्सेदारी 37 टक्के आहे. तसेच जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीत प्रोमोटर्सकडे एकूण 3.28 टक्के हिस्सेदारी आहे. मात्र 100 टक्के हिस्सेदारी मॉर्गेज ठेवण्यात आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.