
GTL Infra Vs Sonu Infra Share | मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. आज देखील शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी 19.96 टक्के वाढीसह 62.50 रुपये किमतीवर ट्रेड करणारे सोनू इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स आज प्रचंड विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते.
मागील आठवड्यात एका मोठ्या बातमीमुळे हा स्टॉक तेजी आला होता, मात्र आज गुंतवणूकदारांनी जबरदस्त नफा वसुली केली. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी सोनू इन्फ्राटेक स्टॉक 9.95 टक्के घसरणीसह 67.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
रिलायन्सकडून ऑर्डर मिळाली
सोनू इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीला विविध नागरी दुरुस्ती आणि देखभाल प्रकल्पांचे काम करण्याचे एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 47.35 कोटी रुपये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही ऑर्डर विविध 5 ग्राहकांनी दिली आहे.
यामध्ये भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज, रिलायन्स सिबूर इलास्टोमर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिक्का पोर्ट्स अँड टर्मिनल्स लिमिटेड, जामनगर युटिलिटीज अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि रिलायन्स सिंगास लिमिटेड यांसारख्या कंपन्या सामील आहेत.
कंपनीबद्दल थोडक्यात
सोनू इन्फ्राटेक लिमिटेड ही कंपनी मुख्यतः बांधकाम संबंधित कंत्राट सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी नागरी बांधकाम, पेंटिंग, प्रकल्प व्यवस्थापन आणि देखभाल सेवा प्रदान करण्याचे काम देखील करते. सोनू इन्फ्राटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 49 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने 60 टक्के वाढीसह 41.67 कोटी रुपये निव्वळ विक्री नोंदवली होती. आणि कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत जून तिमाहीत 83 टक्के वाढीसह 1.74 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.