
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे अप्पर सर्किट हीट करत आहेत. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
नुकताच मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने गुजरात टूलरूम कंपनीला 29 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 59.98 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने गुजरात टूलरूम कंपनीला 29 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून भविष्यात आणखी ऑर्डर मिळण्याची अपेक्षा गुजरात टूलरूम कंपनीने व्यक्त केली आहे. मागील एका वर्षात गुजरात टूलरूम या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 11.20 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत.
मागील एका वर्षात गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 445 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1:10 या प्रमाणात स्प्लिट झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 45 रुपयेवरून वाढून 59.98 रुपये किमतीवर पोहचली आहे. गुजरात टूलरूम लिमिटेड ही कंपनी मुख्यतः सिरिंज मोल्डिंग आणि मोल्ड्स बनवण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.