
GTL Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने गुजरात टूलरूम कंपनीला 65 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. यापूर्वी गुजरात टूलरूम कंपनीला रिलायन्स कंपनीने 29 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. ( रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
गुजरात टूलरूम आणि RIL यांच्यात एकूण 200 कोटी रुपये मूल्याचे करार होणार आहेत. या सकारात्मक बातमीमुळे गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 4.19 टक्के घसरणीसह 32.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 37 रुपये किमतींवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 62.97 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 11.18 रुपये होती. मागील एका वर्षात गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 119 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुजरात टूलरूम कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3000 कोटी रुपये असून प्रॉफिट मार्जीन 10-14 टक्के आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात ही कंपनी मजबूत आर्थिक कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
गुजरात टूलरूम कंपनीची विवेकपूर्ण आर्थिक व्यवस्थापन पद्धती आणि धोरणात्मक वाढीच्या उपक्रमांमुळे स्टॉकमध्ये पुढील काळात तेजी पाहायला मिळू शकते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, मजबूत ऑर्डर पाइपलाइन, अनुकूल आर्थिक दृष्टीकोन आणि वाढती मागणी या घटकांचा फायदा गुजरात टूलरूम कंपनीला होणार आहे. नुकताच प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मने गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सवर ‘BUY’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.