
Gujarat Hy Spin Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत मंदी पाहायला मिळाली होती. अशा कमजोरीच्या काळातही, गुजरात हाय स्पिन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची किंमत 12.19 रुपये किमतीवर अडकली आहे. स्टॉकमध्ये आज कोणतेही प्रकारची खरेदी विक्री पाहायला मिळत नाही.
मागील 5 दिवसात गुजरात हाय स्पिन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11 रुपयेवरून वाढून 12.19 रुपयेवर पोहचले आहेत. 15 मे 2020 रोजी गुजरात हाय स्पिन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 रुपये हा नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी गुजरात हाय स्पिन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12.19 रुपये किमतीवर व्यवहार करत आहेत.
गुजरात हाय स्पिन लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 20.42 कोटी रुपये आहे. मागील काही दिवसांपासून कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, सिंगापूर स्थित परकीय संस्थागत गुंतवणूकदार फर्म NAV Capital BCC ने मायक्रो कॅप कंपनी गुजरात हाय स्पिन लिमिटेडमध्ये 1.10 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदाराने गुजरात हाय स्पिन लिमिटेड कंपनीमध्ये 11.40 रुपये प्रति शेअर या किमतीवर गुंतवणूक केली आहे. गुजरात हाय स्पिन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये असून कंपनीचे बाजार भांडवल 20.42 कोटी रुपये आहे.
गुजरात हाय स्पिन लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 25.69 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 10 रुपये होती. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च 2022 तिमाहीच्या कंपनीने 3.38 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 10 रुपयेवरून वाढून 12.19 रुपयेवर पोहचली आहे.
मागील 1 वर्षात गुजरात हाय स्पिन लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीची कामगिरी पाहून तुम्ही यात पेनी स्टॉक सारखी गुंतवणूक करू शकतो. ही कंपनी एक मायक्रो कॅप कंपनी असून, शाश्वत परतावा मिळवून देण्यात सक्षम नाही. म्हणून गुंतवणूकदारांनी पैसे लावताना संशोधन करणे गरजेचे आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.