
Gujarat Themis Biosyn Share Price | ‘गुजरात थेमिस बायोसिन’ या फार्मा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 2200 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीचे शेअर्स या काळात 34 रुपयेवरून वाढून 780 रुपयेवर पोहचले आहेत.
मल्टीबॅगर शेअर
या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 921.05 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 376.10 रुपये होती. बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के (Gujarat Themis Biosyn Share Price NSE) घसरणीसह 772.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Gujarat Themis Biosyn Share Price BSE)
गुंतवणुकीवर परतावा
‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीच्या शेअरने मागील 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. ज्या लोकांनी चार वर्षापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 23.13 लाख रुपये झाले आहे. 23 मे 2023 रोजी ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीचे शेअर्स 786.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 2213 टक्के नफा मिळवून दिला आहे.
2 वर्षात शेअरने 205% परतावा
जर तुम्ही 23 ऑगस्ट 2019 रोजी गुजरात थेमिस बायोसिन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23.13 लाख रुपये झाले असते. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 205 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुजरात थेमिस बायोसिन कंपनीचे शेअर्स 28 मे 2021 रोजी 257.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जर तुम्ही 28 मे 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.05 लाख रुपये झाले असते. मार्च 2023 तिमाहीत ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीने 28.17 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे, त्यात कंपनीने 11.69 कोटी रुपये नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.