
HAL Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. अनेक टॉप कंपन्यांचे शेअर्स घसरले असून ते स्वस्तात खरेदीची (NSE: HAL) संधी आहे. स्टॉक मार्केटमधील घसरणीत डिफेन्स कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना विशेष रणनीती सुचवली आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
ब्रोकरेज फर्मचा सल्ला
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर आता गुंतवणूकदारांचे शेअरच्या तेजीकडे आहे. ब्रोकरेज फर्म सुद्धा या शेअरमध्ये तेजी येण्याचे संकेत देत आहेत. सततच्या घसरणीनंतर आता हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड शेअरची किंमत सुधारू शकते, कारण पुढील तिमाहीत कंपनीचे उत्पन्न चांगले राहण्याची अपेक्षा आहे.
कंपनीचे आर्थिक निकाल
दुसऱ्या तिमाही निकालानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर उच्चांकी पातळीवरून २८ टक्क्यांनी घसरला आहे. घसरणीनंतर हा शेअर आता रेझिस्टन्सच्या टप्प्यात जाऊ शकतो, असे तज्ज्ञांनी संकेत दिले आहेत.
दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा पीएटी (करोत्तर नफा) 22 टक्क्यांनी वाढून 1510 कोटी रुपये झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा नफा 22 टक्क्यांनी वाढून 1,510 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीने १,२३७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
शेअर टार्गेट प्राईस
तज्ज्ञांनी या शेअरसाठी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मात्र शेअरमध्ये पुन्हा तेजी दिसून येईल. जर गुंतवणूकदारांनी 3-4 महिने शेअर ‘HOLD’ केला तर तो 5000 रुपयांपर्यंत वाढू शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. ट्रेंड लाइनवर 8 तज्ज्ञांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
मल्टिबॅगर परतावा
मागील ६ महिन्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 1.93% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 96.15% परतावा दिला. मागील ५ वर्षात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 919.89% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारवर हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 45.12% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.