 
						HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 2110.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, एचएएल आणि एअरबस या दोन मोठ्या विमान निर्मत्या कंपन्यांनी एक करार केला आहे. या कराराअंतर्गत या दोन्ही कंपन्या A-320 फॅमिली विमानांच्या दुरुस्तीसाठी केंद्रे करणार आहेत.
या सकारात्मक बातमीमुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली होती. या कराराअंतर्गत एअरबस कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला A-320 फॅमिली एअरक्राफ्टसाठी MRO सेंटर उभारण्याकरता टूल पॅकेज आणि विशेष सल्लागार सेवा प्रदान करणार आहे.
शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के वाढीसह 2,056.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. एचएएल कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, या नवीन भागीदारीद्वारे एचएएल आणि एअरबस कंपन्या एमआरओ सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. नोव्हेंबर 2024 पासून हे केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.
एचएएल कंपनीने म्हटले आहे की, डीजीसीएने मंजुरी दिल्यानंतर एमआरओ केंद्र नोव्हेंबर 2024 मध्ये पासून कार्यान्वित होईल. या भागीदारीमुळे भारत सरकारच्या मेक इन इंडिया मिशनला अधिक बळ मिळेल. विमानाच्या देखभाल संबंधित सेवांच्या बाबतीत भारत स्वावलंबी होईल. काही वर्षांपासून भारत सरकारचेही या विमान देखभाल क्षेत्रावर बरेच लक्ष आहे.
मागील 1 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.32 टक्क्यांच्या वाढीसह 2056.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 6 महिन्यांत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 36 टक्क्यांनी वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. मागील एका वर्षात या सरकारी संरक्षण कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		