2 May 2025 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

HAL Share Price | भरवशाच्या एचएएल शेअर्सबाबत खुशखबर, शेअर्स गुंतवणुकदारांना किती फायदा होणार?

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.21 टक्क्यांच्या वाढीसह 2794 रुपये किमतीवर पोहचले होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपली 2806 रुपये उच्चांक किंमत पातळी ओलांडली होती.

एचएएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.87 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2813 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1150 रुपये होती. आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी एचएएल स्टॉक 0.71 टक्के वाढीसह 2,759.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

15 फेब्रुवारी 2019 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 312 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीपासून एचएएल स्टॉक तब्बल 800 टक्के मजबूत झाला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करणारी दिग्गज कंपनी मानली जाते.

या कंपनीमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी देखील आपला हिस्सा वाढवला आहे. सध्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीकडे 82000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर प्रलंबित आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्प कालावधीत तसेच दीर्घ कालावधीत श्रीमंत केले आहे.

जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 500000 रुपये झाले असते. या कंपनीने आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे उत्कृष्ट निकाल सादर केले आहेत. सप्टेंबर तिमाहीत एचएएल कंपनीच्या विक्रीत 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर कंपनीच्या निव्वळ नफ्यात दोन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

HAL कंपनीने नुकताच हवाई आणि संरक्षण प्रणालींची निर्मिती करण्यासाठी विविध परकीय कंपन्यांसोबत तंत्रज्ञान सहकार्य करार संपन्न केला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी भारतीय संरक्षण परिसंस्थेच्या डिझाईन, विकास आणि निर्मितीचे काम करते.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी भारतीय हवाई दल, नौदल, लष्कर आणि तटरक्षक दलासाठी विविध मशिन्स, उपकरणे आणि संरक्षण साहित्य बनवण्याचे काम करते. या सकारात्मक बाबीमुळे अनेक परकीय गुंतवणूकदार एचएएल कंपनीचे शेअर्स खरेदी करून आपला हिस्सा वाढवत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE 13 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या