 
						HAL Share Price | एचएएल या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी एचएएल स्टॉक 10 टक्के वाढीसह 4799.90 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका महिन्यात एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीने एरोस्पेस विभागात एका नवीन फॅसिलिटीचे उद्घाटन केले आहे. यामुळे कंपनीच्या रॉकेट उत्पादनाची क्षमता वाढणार आहे. एचएएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5434.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1730.50 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी एचएएल स्टॉक 0.82 टक्के वाढीसह 4,705 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ISRO चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी बुधवारी बेंगळुरूमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या एरोस्पेस विभागात प्रोपेलंट टँक उत्पादन आणि संगणक संख्यात्मक नियंत्रण मशीनिंग फॅसिलिटीचे उद्घाटन केले आहे. एचएएल कंपनीचे नवीन उत्पादन केंद्र लॉन्च व्हेईकल मार्क-3 प्रोग्रामसाठी एक मजबूत आधार ठरणार आहे. सध्या एचएएल कंपनीची रॉकेट उत्पादन क्षमता वर्षाला फक्त दोन LVM-3 ची आहे. आता या नवीन उत्पादन केंद्रामुळे एचएएल कंपनीची वार्षिक रॉकेट उत्पादन क्षमता 6 LVM-3 रॉकेटची होणार आहे.
मागील एका वर्षात एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 7 जून 2023 रोजी एचएएल स्टॉक 1744.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 6 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4799.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 75 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 7 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 2690.30 रुपये किमतीवर पोहचला होता.
6 जून 2024 रोजी एचएएल कंपनीचे शेअर्स 4800 रुपये किमतीवर पोहचले होते. 2024 या वर्षात एचएएल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 68 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1400 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. 5 जून 2020 रोजी या डिफेन्स कंपनीचे शेअर्स 315.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 4700 रुपये किमतीच्या पार गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		