
Hardwyn Share Price | हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 41.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1440 कोटी रुपये आहे. हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 62.27 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 23.45 रुपये होती.
मागील 5 दिवसांत हार्डविन इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे.
हार्डविन इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 420 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी हार्डविन इंडिया स्टॉक 0.37 टक्के वाढीसह 40.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
27 एप्रिल 2018 रोजी हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स 67 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक आतापर्यंत 6000 टक्क्यांनी वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने आपल्या ऑपरेशन्समधून 36.34 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 27.15 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षात शेवटच्या तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 34.87 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 1.90 कोटी रुपये PBT नोंदवला होता. मागील आर्थिक वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1.42 कोटी रुपये PBT नोंदवला होता. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 1.61 कोटी रुपये PBT नोंदवला होता. हार्डविन इंडिया कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 1.34 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1 कोटी रुपये आणि मागील आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत या कंपनीने 1.16 कोटी PBT नोंदवला होता. हार्डविन इंडिया ही कंपनी मुख्यतः हार्डवेअर फिटिंग मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करते. ही कंपनी बिल्डर्सना आपले सेवा प्रदान करण्याचा काम करते. हार्डविन इंडिया कंपनी बहुउत्पादन आणि कापड व्यवसाय देखील करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.