
Harsha Engineers International Share Price | ‘हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी 0.88 टक्के वाढीसह 338.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या IPO प्राइस बँडच्या जवळ ट्रेड करत आहेत. तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘हर्षा इंजिनियरिंग’ कंपनीचे शेअर्स 26 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजारात 450 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. (Harsha Engineers International LImited)
‘हर्षा इंजिनियरिंग इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर ब्रोकरेज फर्म ‘आनंद राठी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस’ ने ‘बाय’ टॅग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने 1 वर्षाच्या कालावधीसाठी या कंपनीच्या शेअरची किंमत 440 रुपये निश्चित केली आहे. Tips2Trades फर्मचे तज्ञ ‘हर्षा इंजिनियरिंग इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीच्या चार्ट पॅटर्नवर सकारात्मक आहेत. अल्पावधीत हा स्टॉक 358 ते 387 रुपये पर्यंत वाढू शकतो, असे तज्ञांना वाटते.
मागील एका महिन्यात ‘हर्षा इंजिनियरिंग इंटरनॅशनल लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स 5.12 टक्के कमजोर झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या स्टॉकमध्ये 23.18 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. 2023 या वर्षातील तीन महिन्यात हर्षा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 12.63 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 527.65 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 309 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.