 
						Hathway Share Price | हॅथवे केबल अँड डेटाकॉम या मुकेश अंबानीची मालकी असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या 25 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.60 टक्के वाढीसह 22.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 22.30 रुपये किमतीवर पोहचले होते. ( हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनी अंश )
आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनीचे शेअर्स 3.29 टक्के घसरणीसह 20.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 27.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
डिसेंबर 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 25 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीच्या प्रवर्तक गटात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी, जिओ कंटेंट डिस्ट्रिब्युशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, जिओ इंटरनेट डिस्ट्रिब्युशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, जिओ केबल आणि ब्रॉडबँड होल्डिंग या कंपन्या सामील आहेत.
Jio Content कंपनीने हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनीचे 55,05,29,562 शेअर्स म्हणजेच जवळपास 31.10 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत. त्याच वेळी Jio इंटरनेट कंपनीने हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनीचे 22,06,41,491 शेअर्स म्हणजेच 12.46 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
डिसेंबर तिमाहीत हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनीने 30.75 कोटी रुपये ग्रॉस प्रॉफिट कमावला होता. त्यापैकी कंपनीचा निव्वळ नफा 22.35 कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 512.36 कोटी रुपये होता. कंपनीने एकूण 535 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. हॅथवे केबल अँड डेटाकॉम ही कंपनी भारतात केबल ब्रॉडबँड सेवा प्रदान करण्याचा व्यावसाय करते. हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनी आपली उपकंपनी Hathway Digital Private Limited द्वारे केबल टेलिव्हिजन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		