
Hawkins Cooker Share Price | हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना लाभांश वाटप करणार आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6,690 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 6,650.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
एकेकाळी हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीचे शेअर्स फक्त 19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 6650 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच या कालावधीत हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 33687 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.37 कोटी रुपये झाले असते. हॉकिन्स कुकर ही कंपनी BSE इंडेक्सवर सूचीबद्ध आहे.
हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनी मुख्यतः किचन वेअरचे उत्पादन, व्यापार आणि विक्री संबंधित व्यवसाय करते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 141.60 टक्के वाढली आहे. इतका भरघोस परतावा दिल्यानंतर आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 100 रुपये लाभांश वाटप करणार आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने 24 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत शेअर्सच्या दर्शनी मूल्यावर 1000 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 09 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एजीएममध्ये लाभांश वाटपावर शेअर धारकांची मंजुरी घेतली जाईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.