
HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.9 टक्के वाढीसह 50.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक किंचित वाढीसह हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. या महिन्यात हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, ब्रोकरेज हाऊस Elara Capital ने हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या स्टॉकवर 63 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुन 2024 रोजी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 48.93 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेजने फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, मागील काही वर्षापासून भारतात पायाभूत प्रकल्पांच्या विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. या क्षेत्रातील नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी सज्ज आहे. या कंपनीने आपल्या कर्जाची परतफेड केली आहे. शिवाय कंपनीने अणुऊर्जा, जलविद्युत ऊर्जा आणि वाहतूक यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याचे धोरण आखले आहे.
मागील एका वर्षात हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 162 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 70 टक्के वाढली आहे. मागील 6 पैकी 3 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना सकारात्मक परतावा कमावून दिला आहे. मे महिन्यात या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरले होते. तर जूनमध्ये हा स्टॉक 31 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. एप्रिलमध्ये या स्टॉकने गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला होता.
मार्च आणि फेब्रुवारीमध्ये हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन स्टॉक अनुक्रमे 21 टक्के आणि 8.6 टक्क्यांनी खाली आला होता. जानेवारी 2024 या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53.5 टक्के परतावा कमावून दिला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 51.13 रुपये होती. 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 17.05 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीवरून हा स्टॉक 184 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.