
HCL Tech Share Price | एचसीएल टेक या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुसऱ्या तिमाहीत 10 टक्के वाढ झाली आहे. तर कंपनीच्या महसुलात 8 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या सकारात्मक तिमाही निकालामुळे शुक्रवारी स्टॉक मजबूत तेजीत आला होता. शुक्रवारी एचसीएल टेक कंपनीचे शेअर्स घसरणीसह ओपन झाले होते.
मात्र नंतर शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली, आणि स्टॉक 3.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. कंपनीची आर्थिक कामगिरी पाहून ब्रोकरेज फर्मने एचसीएल टेक स्टॉकवर 1410 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी एचसीएल टेक स्टॉक 2.72 टक्के वाढीसह 1,257.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
IT क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या एचसीएल टेक कंपनीने गुरुवारी आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत एचसीएल टेक कंपनीने 10 टक्के वाढीसह 3832 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 3,489 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग महसूल वार्षिक आधारावर 8 टक्के वाढीसह 26,672 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर मागील वर्षी कंपनीने 24,686 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
सप्टेंबर 2023 तिमाहीत मजबूत कमाईनंतर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये HCL टेक्नॉलॉजी स्टॉक 3.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1,223.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. UBS, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज, मोतीलाल ओसवाल आणि नुवामा यांसारख्या आघाडीच्या ब्रोकरेज फर्म्सने आपल्या अहवालात एचसीएल टेक स्टॉक बाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने एचसीएल टेक कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 1,180 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे मोतीलाल ओसवाल फर्मने एचसीएल टेक कंपनीच्या शेअरवर 1,410 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. च्यातर कोटक इक्विटीज फर्मने एचसीएल स्टॉकवर 1,410 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.