26 April 2024 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

HCL Technologies Share Price | ही आयटी कंपनी गुंतवणुकदारांना 2100 टक्के डिव्हीडंड देणार, रेकॉर्ड डेट नुसार फायदा घ्या

HCL Technologies Share Price

HCL Technologies Share Price | 31 मार्च 2023 रोजी चालू आर्थिक वर्ष संपणार आहे. अशा परिस्थितीत मार्च महिन्यात अनेक कंपन्या आपल्या शेअर धारकांना लाभांश, बोनस, स्टॉक स्प्लिट इत्यादी लाभ देत आहेत. आता या यादीत आणखी एका दिग्गज कंपनीचे नाव सामील झाले आहे. ही कंपनी आहे, ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’. ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’ कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 2100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटपासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीखची घोषणा केली आहे. (HCL Technologies Limited)

लाभांश रेकॉर्ड तारीख :
‘एचसीएल टेक्नॉलॉजी’ या आयटी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ” ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’ कंपनी पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर 42 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 2100 टक्के लाभांश वाटप करणार आहे. ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’ कंपनीने लाभांश वाटप करण्यासाठी 28 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 19 एप्रिल आणि 20 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल मंजूर करणार आहे.

कंपनीचा लाभांश इतिहास :
‘एचसीएल टेक्नॉलॉजी’ कंपनी यावेळी आपल्या गुंतवणूकदारांना 84 व्यांदा लाभांश लाभ मिळवून देणार आहे. मागील 12 महिन्यांत, ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’ कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 48 रुपये लाभांश वाटप केला होता. म्हणजेच ही आयटी कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना ठराविक काळानुसार लाभांश वाटप करत असते. यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास अधिक वाढत असतो.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 0.72 टक्के घसरणीसह 1,083.00 रुपये किमतीवर ट्रेड (HCL Technologies Share Price Today) करत आहेत. मागील 6 महिन्यांत ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 हे वर्ष कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी काही प्रमाणत चांगले ठरले आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 126.24 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HCL Technologies Share Price 532281 return on 21 March 2023.

हॅशटॅग्स

#HCL Technologies Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x