
HDFC Bank Share Price Today | भारतातील खासगी क्षेत्रातील दिग्गज ‘एचडीएफसी बँक’ ने मार्च 2023 तिमाहीत मजबूत प्रॉफिट कमावला आहे. जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीमध्ये एचडीएफसी बँकेने 12,594.47 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील तिमाहीचे तुलनेत 20.6 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत HDFC बँकेने 10,443.01 कोटी रुपये निव्वळ नफा होता. (HDFC Bank Limited)
तथापि ऑक्टोबर-डिसेंबर 2022 च्या तिमाहीच्या तुलनेत जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत HDFC बँकेचा निव्वळ नफा कमी झाला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 च्या तिमाहीमधे HDFC बँकेने 12,698.32 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत कर्ज तोटा आणि इतर बाबींसाठी बँकेची तरतूद 2,685 कोटी रुपये होती, जी मागील वर्षी जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाहीत 3,312.35 कोटी रुपये होती. HDFC बँकेचे सकल NPA प्रमाण मार्च 2022 मध्ये 1.17 टक्के नोंदवले गेले होते. आणि डिसेंबर तिमाही 2022 च्या अखेरीस 1.23 टक्क्यांवर पोहचले होते. तर मार्च 2023 च्या अखेरीस 1.12 टक्केवर आले आहे.
लाभांश वाटप :
HDFC बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 च्या अंतिम तिमाहीसाठी प्रति इक्विटी शेअर 19 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी HDFC बँकेचे शेअर्स 1.77 टक्के घसरणीसह 1,662.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 24 जानेवारी 2023 रोजी HDFC बँकेचे शेअर्स 1702 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.