 
						Hindustan Aeronautics Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षभरात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी अमेरिकेतून एक खूशखबर आली आहे. या संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेस कंपनी व्यापारी करार केला आहे.
या दोन्ही कंपन्यानी एकत्रित मिळून फायटर जेट तेजस एमके II चे इंजिन बनवण्याचा करार केला आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, आणि या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्र्यानी ही घोषणा केली आहे. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के वाढीसह 3,691.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जीई एरोस्पेस ही कंपनी मागील 40 वर्षापासून भारतात व्यवसाय करत आहे. ही कंपनी मुख्यतः इंजिन, सेवा, अभियांत्रिकी, उत्पादन आणि स्थानिक सोर्सिंग क्षेत्रात व्यवसाय करते. नवीन करारानुसार, जीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपन्या संयुक्तपणे भारतात F414 इंजिनची निर्मिती करणार आहे.
या करारापूर्वी जीई एरोस्पेस कंपनीने भारतीय हवाई दलासाठी LCA Mk2 कार्यक्रमा अंतर्गत 99 इंजिने बनवण्याची घोषणा केली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर 3.28 टक्क्यांच्या वाढीसह 3,640.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील एका महिन्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअरची किंमत 21.27 टक्के मजबूत झाली आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी एचएएल कंपनीमध्ये एक वर्षापूर्वी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 44.16 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 102.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3950 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1718 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		