
Hindustan Construction Company Share Price | ‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड’ ला पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनी ‘मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ सह संयुक्त उपक्रमात बुलेट ट्रेन स्टेशन बांधण्यासाठी 3,681 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीने एक निवेदन जाहीर करून ही माहिती दिली आहे. ही बातमी जाहीर होताच ‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली. आज गुरूवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी ‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 14.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Hindustan Construction Company Ltd)
वर्क ऑर्डर तपशील :
‘नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ ने 508.17 किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनच्या निर्मितीसाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार हा कंत्राट ‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड’ आणि ‘मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ यांना संयुक्त रीत्या देण्यात आला आहे. HCC ने एका आपल्या प्लॅनची माहिती देताना म्हंटले आहे की, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बुलेट ट्रेन स्टेशनमध्ये एकूण सहा प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी अंदाजे 414 मीटर असेल. 16 डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी प्लॅटफॉर्मची लांबी पुरेशी असेल. हे स्टेशन मेट्रो आणि रस्ते वाहतुकीने एकमेकांना जोडले जातील. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर निर्माण करण्यात येणारे हे स्टेशन एकमेव भूमिगत स्टेशन असेल. पृष्ठभागापासून सुमारे 24 मीटर खोलीवर स्टेशन बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्टेशनमध्ये एकूण तीन मजले बांधण्यात येणार आहे.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड’ कंपनीचे महसुल घटले आहे. या काळात कंपनीचा खर्च एकूण उत्पन्नापेक्षा जास्त होता. मात्र सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने वाढीव कमाईसह बचतही केली होती. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 22.70 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत प्रति शेअर 10.55 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.