
Home Buying Tips | सध्या सणांमुळे सगळीकडेच हर्ष आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सणासुदीचा काळ सुरू झाला की, हमखास अनेक उद्योजक ग्राहकांसाठी आकर्षक ऑफरर्स घेऊन येत असतात. यात अगदी किराणामालाच्या वस्तूंपासून, कपडे, मोबाईल फोन अशा सर्वच गोष्टींवर ऑफर दिली जाते. मग यात रिअल इस्टेट कंपन्या तरी मागे कशा राहतील. अनेक बांधकाम व्यवसायीक आपल्या ग्रहकांना मोठ्या सवलतीत घर मिळवून देतात. मात्र अशा वेळी काही दलाल आपली फसवणूक करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घर खरेदी करताय तर सावध व्हा.
महागाईचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात नुकतीच घर खरेदी करणा-यांसाठी एक वाईट बातमी देखील समोर आली. रिझर्व्ह बँकेने आपल्या व्याजात अधिक वाढ केली आहे. यामुळे घराचे कर्ज फेडत असलेल्या आणि नव्याने कर्ज घेऊन घर खरेदी करणा-या सर्वच ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतआहेत. मात्र असे असले तरी अनेक रिअल इस्टेट कंपन्या दिवाळी अगदी तोडावर आलेली असताना अकर्षित ऑफर ग्राहकांना देत आहे. यात स्वतः ला फसवणूकीपासून कसे वाचवायचे हे माहीत करुन घेऊ.
या कागदपत्रांची करा शहानिशा
रजिस्टर पेपर म्हणजेच नोंदणी पत्र आहे का हे तपासा.
घराच्या जुन्या कागदपत्रांची देखील पडताळणी करा.
प्रकल्प लेआउट प्रत रेरावर उपलब्ध आहे का हे पाहा..
बांधकाम दाखवलेल्या नकाशानुसार आहे का तपासून घ्या,
सदर बांधकाम अधिकृत आहे की नाही हे प्रमुख्याने तपासा.
RERA मंजूरी काय आहे :
प्रत्येकल राज्याचा स्वताचा एक रेरा असतो. यात विकास मालमत्तेचा तपशिल सादर केला जातो. तुम्ही जे घर खरेदी करणार आहात त्याची योजना आणि प्रकल्प रेराच्या वेबसाइटवर पाहायला मिळेल. मालमत्ता भाडेतत्वावर आहे का? हे देखील यात समजते. तसेच सदर प्रकल्पाला रेराने मान्यता दिली आहे की नाही याची माहिती मिळते.
जर तुम्ही एखादे घर इन्वेस्टमेट म्हणून खरेदी करणार असाल तर, व्यवसायीक केंद्र असलेल्या ठिकाणी घर घ्या. कारण असे केल्यास तुमच्या घराची किंमत खुप लवकर वाढेल. तसेच घर भाडेतत्वावर देउन तुम्ही जास्तीचा नफा कमवू शकाल. तसेच घरापासून वाहतूक सुविधा किती अंतरावर हे तपासा. वाहतूक सुविधा जवळ असल्यास तुमच्या घराची विक्री लवकर होईल. तसेच चांगला नफा मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.