
Home Loan EMI| सप्टेंबर 2022 च्या पतधोरण अहवालात भारतीय रिझर्व्ह बँकेने/RBI रेपो दरात 50 बेसिस पॉइंटची म्हणजेच 0.50 टक्केची वाढ केली होती. मे 2022 पासून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने 4 वेळा रेपो दरात एकूण 1.95 टक्क्यांची वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकाकडून व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने बहुतांश लहान-मोठ्या बँकांनीही आपले गृहकर्जाचे व्याजदर वाढवायला सुरुवात केली आहे. गृहकर्जावरील व्याजदर असेच वाढत राहिले तर मासिक EMI मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. परंतु जर तुम्ही EMI कमी करण्यासाठी कर्जाचा कालावधी वाढवण्याच्या भानगडीत पडलात तर तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
कर्जाची मुदत वाढवू नका :
आजकाल लोक अशा चुका सर्रास करताना दिसतात. मासिक EMI कमी करण्यासाठी बँका अनेक लोकांना कर्जाची मुदत वाढवून देतात. उदाहरणार्थ, 20 वर्षांच्या कर्जा ऐवजी, त्यांना 25 वर्षे किंवा अगदी 30 वर्षे सर्रास कर्ज फेडण्याची मुदत वाढवून दिली जाते. त्यामुळे दर महिन्याला भरावा लागणारा EMI चा हप्ता काही रुपये कमी होतो, पण त्यात कर्जाचे व्याज जोडल्यास तुमच्यावर लाखो रूपयांचा अतिरिक्त बोजा पडतो. त्यामुळे, कर्जाचा कालावधी वाढवण्यापेक्षा आणि वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर तपासा आणि कमी व्याज दर असलेली बँक शोधा.
प्रकरण 1 :
जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाखांचे कर्ज घेतले असल्यास
* एकूण कर्ज : 30 लाख
* परतफेड कालावधी : 20 वर्षांचे
* कर्जावरील व्याज दर : 8.50 टक्के सरासरी
* मासिक EMI हफ्ता : 26033 रुपये
* एकूण व्याज देय रक्कम : 32,48,327 रुपये
* एकूण परतफेड रक्कम: 62,48,327 रुपये
प्रकरण 2 :
जर तुम्ही 25 वर्षांसाठी 30 लाखांचे कर्ज घेतले असल्यास
* एकूण कर्ज रक्कम : 30 लाख रुपये
* परतफेड कालावधी : 25 वर्ष
* कर्जावरील व्याजदर : 8.50 टक्के सरासरी
* मासिक EMI हफ्ता : 24157 रुपये
* एकूण व्याज रक्कम : 42,47,044 रुपये
* एकूण परतफेड रक्कम : 72,47,044 रुपये
प्रकरण 3 :
जर तुम्ही 30 वर्षांसाठी 30 लाखांचे कर्ज घेतले असल्यास
* एकूण कर्ज रक्कम : 30 लाख रुपये
* परतफेड कालावधी : 30 वर्षे
* कर्जावरील व्याजदर : 8.50 टक्के सरासरी
* मासिक EMI हफ्ता : 23067 रुपये
* एकूण व्याज रक्कम : 53,04,266 रुपये
* एकूण परतफेड रक्कम : 83,04,266 रुपये
वरील आकडेवारीत तुम्ही पाहू शकता की 20 वर्षे, 25 वर्षे आणि 30 वर्षांच्या कालावधीसाठी 30 लाखांच्या कर्जावर व्याज 32,48,327 रुपये, 42,47,044 रुपये, आणि 53,04,266 रुपये वाढते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.