
Home Loan Tips | सध्या घर खरेदीकरण्यासाठी पैसे नसले तरी हरकत नाही कारण हल्ली घर खरेदीसाठी गृहकर्ज सहज उपलब्ध आहे. अशा वेळी गृहकर्जाच्या माध्यमातून आपले घर खरेदी करण्याची गरज पूर्ण होऊ शकते. सोबतच जर तुम्ही पहिल्यांदाच गृहकर्ज घेणार असाल तर तुम्हालाही मिळतील हे पाच मोठे फायदे.
गृहकर्ज व्याजदर
घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मोठ्या रकमेचीही गरज आहे. सध्या घर खरेदीकरण्यासाठी पैसे नसले तरी हरकत नाही कारण हल्ली घर खरेदीसाठी गृहकर्ज सहज उपलब्ध आहे. अशा वेळी गृहकर्जाच्या माध्यमातून आपले घर खरेदी करण्याची गरज पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही पहिल्यांदा होम लोन घेणार असाल तर हे पाच मोठे फायदे देखील तुम्हाला मिळणार आहेत.
टॅक्स सवलत
गृहकर्जाच्या माध्यमातूनही करसवलतीचा लाभ मिळतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम २४ (ब) अन्वये प्रत्येक आर्थिक वर्षाच्या व्याजावर २ लाख रुपयांपर्यंत आणि कलम ८० सी अंतर्गत मूळ रकमेच्या परतफेडीवर दीड लाख रुपयांपर्यंत सूट आहे.
सहअर्जदार असण्याचे फायदे
घर खरेदी करताना सहअर्जदार असेल तर त्याचेही अनेक फायदे आहेत. ईएमआय विभागला जातो, करसवलतीचा तितकाच फायदा होतो. गृहकर्ज सहज उपलब्ध आहे. घराची मालकी विभागली जाते.
सहअर्जदारांमध्ये महिलांना मिळणारे फायदे
सहअर्जदार महिला असल्यास अनेक बँका गृहकर्जावर कमी व्याजदर देतात. याचा कर्जावरील व्याजावर मोठा परिणाम होऊन व्याज कमी होते.
प्री-पेमेंट
होम लोनमध्ये प्री-पेमेंटचाही फायदा मिळतो. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल आणि ते लवकरात लवकर भरायचे असेल तर तुम्ही प्री-पेमेंटही करू शकता. प्री-पेमेंटवर व्याज कमी होते.
होम लोन टॉप-अप
इमर्जन्सी फंडासाठी होम लोन टॉप-अपचा वापर केला जाऊ शकतो. या निधीचा उपयोग वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती तसेच इतर महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचा उपयोग अभ्यासासाठीही होऊ शकतो.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.