4 May 2025 4:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

HUDCO Share Price | PSU स्टॉकची कमाल! 6 महिन्यात पैसे तिप्पट झाले, पुढेही मालामाल करणार

HUDCO Share Price

HUDCO Share Price | हुडको कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांनी वाढले होते. आज हा स्टॉक किंचित घसरणीसह क्लोज झाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत होती. बीएचईएल कंपनीचा स्टॉक काल 11.68 टक्क्यांच्या वाढीसह 285.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर एनटीपीसी स्टॉक 4.72 टक्क्यांच्या वाढीसह 357.10 रुपये किमतीवर पोहचला होता.

स्टेट बँक ऑफ इंडिया स्टॉक 3.76 टक्क्यांनी वाढला होता. तर कोल इंडिया कंपनीचे शेअर्स 3.58 टक्के मजबूत झाले होते. HUDCO कंपनीचा स्टॉक 238 रुपये किमतीवर ओपन झाला होता, आणि दिवसा अखेर शेअर 8.88 टक्क्यांच्या वाढीसह 253.75 रुपये किमतीवर व्यवहार करत होता. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी हुडको स्टॉक 0.54 टक्के घसरणीसह 248.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

सप्टेंबर 2023 पासून हुडको कंपनीचे प्रवर्तक आपली शेअर होल्डिंग कमी करत आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांकडे 81.81 टक्के भाग भांडवल होते. तर डिसेंबर 2023 मध्ये कंपनीच्या प्रवर्तकांकडे 75.17 टक्के भाग भांडवल शिल्लक राहिले होते. मार्च 2024 मध्ये त्यांचा वाटा 75 टक्केवर आला होता. मागील काही महिन्यांपासून हुडको कंपनीमधे परकीय संस्थागत गुंतवणूकदारांचा वाटा वाढत आहे. जून 2023 मध्ये त्यांचा हिस्सा केवळ 0.33 टक्के होता, तो सप्टेंबरमध्ये वाढून 0.65 टक्केवर गेला आहे.

डिसेंबर 2023 मध्ये हुडको कंपनीत परकीय संस्थागत गुंतवणूकदारांचा वाटा 1.20 टक्के आणि मार्च 2024 मध्ये 1.91 टक्के झाला होता. मार्च 2024 मध्ये देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हुडको कंपनीचे 11.39 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर डिसेंबरमध्ये त्यांच्याकडे कंपनीचे 11.80 टक्के भाग भांडवल होते. सप्टेंबर 2023 मध्ये देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 7.15 टक्केवर आला होता. आणि जून 2023 मध्ये त्यांचा वाटा 7.17 टक्केवर आला होता.

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हुडको स्टॉक पाच टक्क्यांनी घसरला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात हुडको स्टॉक 190 टक्के मजबूत झाला आहे. जर तुम्ही सहा महिन्यापूर्वी हुडको स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.90 लाख रुपये झाले असते. 2024 या वर्षात हुडको स्टॉक आतापर्यंत 95 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 60.75 रुपयेवरून वाढून 153 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 300 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.90 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HUDCO Share Price NSE Live 07 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Hudco Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या