
HUDCO Share Price | हुडको म्हणजेच हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजने हुडको स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ईलारा सिक्युरिटीज फर्मने हुडको स्टॉकवर 297 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, हा स्टॉक शुक्रवार दिनांक 24 मे रोजीच्या बंद किमतीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी वाढू शकतो. एलारा सिक्युरिटीज फर्मला विश्वास आहे की, हुडको या पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी हुडको स्टॉक 2.03 टक्के घसरणीसह 257.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 1 वर्षात हुडको कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 363 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 मे 2023 रोजी हुडको कंपनीचे शेअर्स 55.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 258.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2024 या वर्षी हुडको स्टॉक 100 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत हुडको स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 277.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 54.40 रुपये होती.
मागील 2 वर्षात हुडको कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 680 टक्के परतावा कमावून दिला आहे 27 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 33.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 24 मे 2024 रोजी हुडको स्टॉक 258.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 6 महिन्यांत हुडको स्टॉक 217 टक्क्यांनी वाढला आहे. 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 81.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मार्च 2024 तिमाहीत हुडको कंपनीने 700 कोटी रुपये नफा कमावला आहे. मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीच्या तिमाही नफ्यात 9.54 टक्क्यांची वाढ झाली आहे. हुडको कंपनीने वर्षभरापूर्वी याच तिमाही कालावधीत 639.14 कोटी रुपये नफा कमावला होता. मार्च 2024 च्या तिमाहीत हुडको कंपनीने 2194.04 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि एका वर्षापूर्वी याच तिमाही कालावधीत कंपनीने 1862.41 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.