18 May 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
x

Ideaforge Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या कंपनीची अमेरिकन मार्केटमध्ये एन्ट्री, स्टॉक पुन्हा मल्टिबॅगर?

Ideaforge Share Price

Ideaforge Share Price | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी निर्माण झाली होती. या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 781 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने अमेरिकन ड्रोन मार्केटमध्ये एन्ट्री केल्याची बातमी आल्यामुळे या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढू लागले.

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी ही कंपनी नागरी आणि संरक्षण ड्रोनच्या दुहेरी वापर श्रेणीत जगात पाचवी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी स्टॉक 7.80 टक्के वाढीसह 786 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

नुकताच आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने यूएस मार्केटमध्ये आपल्या ड्रोन्सचे प्रदर्शन केले आहे. कंपनीच्या सीईओने एका निवेदनात म्हंटले आहे की, “कंपनीने जबरदस्त स्पर्धा असणाऱ्या अमेरिकन बाजारपेठेत आपले ड्रोन्स प्रदर्शित केले आहेत.

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने अशा वेळी अमेरिकन ड्रोन मार्केटमध्ये प्रवेश केला आहे जेव्हा अमेरिकन ग्राहक चीनद्वारे निर्मित स्वस्त ड्रोन खरेदी करण्यास इच्छुक नाही”. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ स्टॉक 672 रुपये या इश्यू किमतीवरून 1344 रुपये किमतीवर पोहचला होता. मात्र विक्रीच्या दबावामुळे या कंपनीचे शेअर्स पुन्हा घसरले.

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 26 जून ते 30 जून 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचा IPO एकूण 106 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीचे शेअर्स 7 जुलै 2023 रोजी 1305.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 1344 रुपये किंमत स्पर्श केली होती. 14 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 689 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ideaforge Share Price NSE Live 24 February 2024.

हॅशटॅग्स

ideaForge Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x