
IKIO Lighting IPO GMP Today | IKIO लायटिंग कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. IKIO लायटिंग कंपनीचा IPO 3 दिवस गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. याकाळात हा IPO 75 पट सबस्क्राइब झाला होता. IPO च्या शेवटच्या दिवशी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 163 पट सबस्क्राईब झाला होता.
ज्या गुंतवणूकदारांनी IKIO लायटिंग कंपनीच्या IKIO लायटिंग कंपनीच्या IPO स्टॉकवर पैसे लावले होते, ते आता शेअर वाटपाची आतुरतेने वाट पाहत आहेत. IKIO लायटिंग कंपनी 13 जून 2023 रोजी गुंतवणुकदारांना शेअर्सचे वाटप करेल.
IKIO लायटिंग GMP
IKIO लायटिंग कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 114 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आता शेअरची ग्रे मार्केट किंमत 1 रुपये वाढली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IKIO लायटिंग कंपनीचा IPO स्टॉक 113 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. मागील काही दिवसांत IKIO लायटिंग कंपनीचा जीएमपी 70 रुपयेवरून वाढून 114 रुपये किमतीवर पोहोचला आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना हा स्टॉक चांगलीच कमाई करून देणार आहे.
अपेक्षित लिस्टिंग किंमत
IKIO लायटिंग कंपनीचा IPO स्टॉक 399 रुपये किमतीवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. IKIO Lighting कंपनीच्या IPO स्टॉकची प्राइस बँड 270 रुपये ते 285 रुपये निश्चित करण्यात आली होती. पुढील काळात जर ही ग्रे मार्केट किंमत टिकुन राहिली तर हा स्टॉक 399 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच हा IPO गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 40 टक्के नफा कमावून देऊ शकतो. IKIO लाइटिंग कंपनीचा स्टॉक 16 जून 2023 रोजी सूचीबद्ध होऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.