15 December 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
x

IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग IPO शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होण्यास सज्ज, गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार?

Highlights:

  • IKIO Lighting IPO
  • ग्रे मार्केट प्रिमियम
  •  एका लॉटमध्ये 52 शेअर्स
IKIO Lighting IPO

IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग या LED लाइटिंग सोल्युशन्स प्रदान करणाऱ्या कंपनीच्या IPO ला बंपर प्रतिसाद मिळाला आहे. IKIO लायटिंग कंपनीचा IPO एकूण 67.75 पट सबस्क्राइब झाला आहे. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला जोरदार प्रतिसाद दिला असून IKIO लायटिंग स्टॉक ग्रे मार्केटमध्ये तेजीत वाढत आहे.

ग्रे मार्केटमध्ये IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. IKIO लायटिंग कंपनी IPO द्वारे 607 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

ग्रे मार्केट प्रिमियम :

IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केट मध्ये 122 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. IKIO लायटिंग कंपनीच्या IPO ची किंमत बँड 270-285 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर या कंपनीचे शेअर्स 285 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आले आणि, 122 रुपये ग्रे मार्केट प्रीमियम किंमत टिकुन राहिली तर या कंपनीचे शेअर्स 407 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगवर 43 टक्के नफा मिळू शकतो.

IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स 16 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. IKIO Lighting कंपनीच्या IPO शेअर्सचे वाटप 13 जून 2023 रोजी पूर्ण केले जाईल. IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स 16 जून 2023 रोजी सूचीबद्ध केले होऊ शकतात. IKIO लायटिंग कंपनीचा IPO 6 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

 एका लॉटमध्ये 52 शेअर्स

किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. कंपनीने एका लॉटमध्ये 52 शेअर्स ठेवले आहेत. पब्लिक इश्यूनंतर IKIO लायटिंग कंपनीमध्ये प्रवर्तकांची एकूण हिस्सेदारी 72.46 टक्के होईल.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IKIO Lighting IPO today on 10 June 2023

हॅशटॅग्स

#IKIO Lighting IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x