
Income Tax Alert | बँक खात्याशी आधार कार्ड पॅन कार्डशी जोडले जात आहे. असे असूनही अद्याप आधार पॅन लिंक न केलेली मोठी लोकसंख्या आहे. अशात आता आयकर विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होणार नाहीत, त्यांचे पॅन कार्ड 31 मार्च 2023 नंतर निष्क्रिय होतील. (Pan Aadhaar Card Linking)
या प्रकरणी आयकर विभागाने शनिवारी जाहीर सल्ला दिला आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पॅनला आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे, 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी लिंक न केलेले पॅन कार्ड अॅक्टिव्हेट होईल. अशावेळी ज्यांनी पॅन आधार कार्डशी लिंक केलं आहे, त्यांनी ते लवकरच लिंक करणं गरजेचं आहे.
आयकर कायदा, १९६१ नुसार जे पॅनधारक सूट श्रेणीत येत नाहीत, अशा सर्व पॅनधारकांना हे बंधनकारक आहे. 1 एप्रिल 2023 पासून पॅन आधार लिंक न करता निष्क्रिय करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात काही नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मे २०१७ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालय या राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना सूट देण्यात येणार आहे. आयकर कायदा, १९६१ नुसार अनिवासी, मागील वर्षभरात कोणत्याही वेळी ८० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या आणि भारताचे नागरिक नसलेल्या व्यक्तींना सूट देण्यात येणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.