
Income Tax Slab 2024 | यावेळी आयकर दात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे का? केंद्र सरकार यावेळी इन्कम टॅक्सची बेसिक सूट लिमिट वाढवून 5 लाख रुपये करू शकते, अशी चर्चा आहे. यावेळी प्राप्तिकर भरणाऱ्यांसाठी इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात, असेही बोलले जात आहे.
पण प्रश्न असा आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी करदात्यांच्या या अपेक्षा पूर्ण करतील का? विशेषत: गेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सरकारी तिजोरीत येणाऱ्या प्रत्येक रुपयामागे वैयक्तिक आयकर दाते 19 पैशांचे योगदान देतात. सरकारी महसुलाच्या इतर कोणत्याही स्त्रोतापेक्षा हे प्रमाण जास्त आहे.
जुन्या टॅक्स प्रणालीत विद्यमान स्लॅब काय आहेत
इन्कम टॅक्सच्या स्लॅब रेटमध्ये बदल होण्याची शक्यता असताना, प्राप्तिकर भरणाऱ्यांसाठी सध्याचे टॅक्स स्लॅब काय आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे. नव्या कर प्रणालीच्या टॅक्स स्लॅबची माहिती आम्ही आधीच दिली आहे. आता पाहूया जुन्या करप्रणालीत कराचे सध्याचे स्लॅब काय आहेत.
जुन्या टॅक्स प्रणालीचे विद्यमान स्लॅब
* वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपये : शून्य टॅक्स
* वार्षिक 2.50 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत चे उत्पन्न : 2.50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स
* ₹ 5 लाख ते ₹ 10 लाख वार्षिक उत्पन्न : ₹ 12,500 + ₹ 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 20% टॅक्स
* 10 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न : 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 1,12,500 + 30%
नव्या व्यवस्थेत काय आहेत टॅक्स स्लॅब
सरकारने 2020 च्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली आणली. ही एक सोपी कर प्रणाली म्हणून सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये जुन्या कर प्रणालीप्रमाणे करसवलतीचा दावा करण्यासाठी विशिष्ट साधनांमध्ये गुंतवणूक करण्याची आणि करमुक्त वस्तूंवर झालेल्या खर्चाचा पुरावा देण्याची आवश्यकता नव्हती. पुढे या योजनेत वेळोवेळी अनेक बदलही करण्यात आले. सध्याच्या स्वरूपातील नव्या व्यवस्थेचे कर स्लॅब खालीलप्रमाणे आहेत.
* तीन लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न : शून्य टॅक्स
* वार्षिक उत्पन्न ₹ 3 ते ₹ 6 लाख : 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 5% टॅक्स
* ₹ 6 लाख ते ₹ 9 लाख उत्पन्न : ₹ 15,000 + ₹ 6 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 10% टॅक्स
* 9 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न : 45,000 रुपये + 9 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 15 टक्के टॅक्स
* ₹ 12 लाख ते ₹ 15 लाख उत्पन्न : ₹ 90,000 + ₹ 12 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 20% टॅक्स
* 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न : 1.5 लाख + 15 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% टॅक्स
टॅक्स स्लॅबची नवी रचना कशी असू शकते?
टॅक्स स्लॅब बदलण्याची चर्चा आहे, पण टॅक्स स्लॅबची नवी रचना कशी असू शकते, हा प्रश्न आहे. याबाबत विविध सूचनाही समोर येत आहेत. टॅक्स स्लॅबची नवी रचना अशी काही असू शकते का?
* 3 लाखांपर्यंत : शून्य टॅक्स
* 3 लाख ते 6 लाख : 5% टॅक्स
* 6 लाख ते 9 लाख : 10% टॅक्स
* 9 लाख ते 12 लाख : 15% टॅक्स
* 12 लाख ते 15 लाख रुपये: 20% टॅक्स
* 15 लाख ते 20 लाख रुपये: 25% टॅक्स
* 20 लाख रुपये आणि त्याहून अधिक: 30 टक्के टॅक्स
मात्र, 30 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कमाल 30 टक्के कर लावण्यात यावा, असेही काही जण सुचवत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.