
Income Tax Slab | उदरनिर्वाहासाठी कमाई खूप महत्त्वाची ठरते. अशा तऱ्हेने लोक कमावण्यासाठी नोकरी करतात किंवा व्यवसायही करतात. त्याचबरोबर जसजशी कमाई वाढते तसतसे लोकांची कर भरण्याची जबाबदारीही वाढते आणि लोकांचे उत्पन्न करपात्र होते. अशातच आज आम्ही अशा लोकांना काही खास टिप्स देणार आहोत, ज्यांची मासिक कमाई 42000 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
प्राप्तिकर विवरणपत्र
वास्तविक, देशात दोन करप्रणालीअंतर्गत सरकारकडून आयकर गोळा केला जातो. त्यापैकी एक म्हणजे जुनी करप्रणाली आणि दुसरी नवीन करप्रणाली. या करप्रणालीत वेगवेगळ्या उत्पन्नावर वेगवेगळ्या टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्स वसूल केला जातो. अशापरिस्थितीत जर कोणी जुनी करप्रणाली निवडली तर त्याला अडीच लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नापर्यंत कोणताही आयकर भरावा लागणार नाही.
इन्कम टॅक्स स्लॅब
त्यानंतर अडीच ते पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के आयकर भरावा लागतो. मात्र, सरकारकडून वार्षिक पाच लाखरुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ही पाच टक्के सवलत मिळते. ज्यामुळे लोकांना येथेही कोणताही आयकर भरावा लागत नाही. अशापरिस्थितीत लोकांना काहीसा दिलासाही मिळतो.
20 टक्के आयकर भरावा लागणार
तर जुन्या कर प्रणालीनुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि वार्षिक 10 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना 20 टक्के आयकर भरावा लागणार आहे. अशा परिस्थितीत 5 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न म्हणजे मासिक उत्पन्न 41666 रुपये (सुमारे 42000 रुपये) पेक्षा जास्त असेल तर लोकांना टॅक्स भरावा लागेल.
टॅक्स वाचवण्यासाठी उपाय योजना करा
मात्र, महिन्याचे उत्पन्न टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर लोकांनी ही कर वाचवण्यासाठी उपाय योजना करायला हव्यात. खरे तर लोकांनी कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना लोक टॅक्स वाचवू शकतात. अनेक सरकारी योजनाही आहेत, ज्यात गुंतवणूक करून करबचतीचा लाभ घेता येतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी च्या माध्यमातून वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत कर बचत करता येते.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.