 
						Indus Towers Share Price | इंडस टॉवर या टेलिकॉम कंपन्यांना पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. व्होडाफोन गृपने इंडस टॉवर कंपनीतील 18 टक्के भाग भांडवल 15300 कोटी रुपयेला विकले आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर 336 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( इंडस टॉवर कंपनी अंश )
मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी इंडस टॉवर स्टॉक 1.19 टक्के वाढीसह 340.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
एसबीआय सिक्युरिटीज फर्मने अल्प मुदतीसाठी इंडस टॉवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 331.3-338 रुपये दरम्यान खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, पुढील 3 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 385 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ही किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 15 टक्के अधिक आहे. 3 जून रोजी इंडस टॉवर स्टॉक 370 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्सची नीचांक किंमत पातळी 320 रुपये होती.
इंडस टॉवर ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम टॉवर कंपनी आहे. 31 मार्च 2024 पर्यंत या कंपनीकडे 219736 टॉवर होते. ही कंपनी देशांतील 22 दूरसंचार मंडळांमध्ये आपली सेवा प्रदान करते. ही कंपनी टॉवर पायाभूत सुविधांसाठी भौतिक आधार प्रदान करते. इंडस टॉवर कंपनी रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांना सेवा प्रदान करते. 5G विस्तारामुळे टेलिकॉम क्षेत्रातील वाढीची क्षमता अफाट वाढली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने 2022 मध्ये 17 टेलिकॉम सर्कलमध्ये 5G सेवा देण्यासाठी स्पेक्ट्रम विकत घेतले होते.
इंडस टॉवर्स कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात 336 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 500 रुपये आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के, दोन आठवड्यात 3.3 टक्के आणि एका महिन्यात 1 टक्क्यांनी घसरले आहेत. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 65 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात इंडस टॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		