
Infosys Share Price | 2023-24 या चालू आर्थिक वर्षाचा दुसऱ्या तिमाहीत भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 3.1 टक्के वाढीसह 6215 कोटी रुपये वाढ नोंदवली आहे. तर कंपनीचे उत्पन्न 6.7 टक्क्यांच्या वाढीसह 38,994 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर येस सिक्युरिटीज फर्मने इन्फोसिस स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 1,838 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.49 टक्के वाढीसह 1,438.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
येस सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, इन्फोसिस कंपनीच्या महसुलात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीचा EBITDA मार्जिन देखील अपेक्षेप्रमाणे सकारात्मक राहिला आहे. इन्फोसिस कंपनीने तिमाही दर तिमाही आधारावर महसुलात 2.3 टक्के वाढ साध्य केली आहे.
इन्फोसिस कंपनीचा महसूल USD मध्ये तिमाही दर तिमाही 2.2 टक्के वाढला आहे. तर भारतीय रुपयाच्या तुलनेत 2.8 टक्के वाढला आहे. या तिमाहीत कंपनीच्या EBITDA मार्जिनमध्ये घट आणि SG& A खर्च तिमाही दर तिमाही आधारावर 42 बेसिस पॉइंट्स वाढीसह 21.2 टक्के नोंदवला गेला आहे.
येस सिक्युरिटीज फर्मने इन्फोसिस कंपनीच्या स्टॉकवर 1,838 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 13 ऑक्टोबर 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर इन्फोसिस स्टॉक 2.24 टक्के घसरणीसह 1431.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तिमाही निकालासोबत इन्फोसिस कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 18 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर 2022 तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 6,026 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन 20-22 टक्केवर असून कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 1 ते 2.5 टक्के कमाईचा अंदाज कमी केला आहे.
इन्फोसिस कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 18 रुपये अंतरिम लाभांश वाटप करणार आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 25 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. तर कंपनी गुंतवणुकदारांच्या खात्यात लाभांश 6 नोव्हेंबर 2023 रोजी जमा करेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.